PM Kisan 15th Installment : या तारखेला जमा होणार पीएम किसानचा हप्ता, पण हे काम केले का?

Pm Kisan Yojana 15 kist list : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने (PM Kisan 15th Installment) शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरला आहे. वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येते. प्रत्येक वर्षी या योजनेतंर्गत तीन हप्ते मिळतात. या हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000

 

रुपये जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. DBT माध्यमातून ही रक्कम

 

 

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपये जमा करण्यात आले. पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला ही रक्कम जमा होईल. पण त्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे.

 

 

 

गावानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा

 

 

 

योजनेला झाली पाच वर्षे

 

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. या योजनेतंर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000-2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. एका वर्षात एकूण 6,000 रुपये जमा होतात. या योजनेतंर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान देण्यात येतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या काळात देण्यात येतो. तर तिसरा हप्ता केंद्र सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतो. Pm Kisan Yojana 15 kist list

Leave a Comment

Close Help dada