How to become Rich कोट्यधीश बनायचं असेल तर दररोज वाचवा १०० रुपये, जाणून घ्या गुंतवणूकीचा हा फॉर्म्युला

How to become Rich आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक असतं.

 

आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. कोट्यधीश बनण्यासाठी

(How to become Rich)

आपल्याला खूप पैसे कमवावे लागतील असंही अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही. तुमचं उत्पन्न कमी असलं तरी तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, पैसे कमवण्यापेक्षा त्याची बचत करणं अधिक महत्त्वाचं आहे. जे लोक पैसे वाचवण्यात निष्णात असतात ते चांगला बँक बॅलन्सही तयार करू शकतात.परंतु केवळ पैसे वाचवून कोणी श्रीमंत किंवा कोट्यधीश होऊ शकत नाही. ही बचत योग्य ठिकाणी गुंतवणेही खूप महत्त्वाचं आहे. केवळ गुंतवणुकीची योग्य समज तुम्हाला लवकर कोट्यधीश बनवू शकते. आज आम्ही तुम्हाला कोट्यधीश बनण्याचा असाच एक फॉर्म्युला सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला रोज फक्त १०० रुपये वाचवावे लागतील. दररोज शंभर रुपये वाचवून तुम्ही सहज कोट्यधीश होऊ शकता. कसा होईल फायदाप्रयत्न केल्यास दररोज शंभर रुपये सहज वाचू शकतात. अशा प्रकारे तुमची एका महिन्यात तीन हजार रुपयांची बचत होईल. आता हे पैसे तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवावे लागतील. तुम्हाला अंदाजे २० टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास, २१ वर्षांत म्हणजे २५२ महिन्यांत तुमचा फंड अंदाजे १,१६,०५,३८८ रुपये होईल. या कालावधीत तुम्ही एकूण ७,५६,००० रुपये जमा कराल. तुम्हाला २० टक्क्यांऐवजी 15 टक्के परतावा मिळाला तरीही तुम्हाला जवळपास ५३ लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला कमी वेळात कोट्यधीश व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल.

Leave a Comment

Close Help dada