Drone Subsidy Scheme: महिला बचत गटांना शासनाकडून ड्रोन खरेदीसाठी 8 लाख रुपये मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

Drone Subsidy Scheme: केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. आता राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि महिला बचत गटांना लाभ मिळावा यासाठी सरकारने नवीन ड्रोन अनुदान योजना मंजूर केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिकांवर फवारणी करताना लागणारा मजूर, वेळ आणि खर्च लक्षात घेऊन कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता महिला बचत गटाकडून शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

 

 

 

 

 ड्रोन खरेदी योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

बचत गट महिला ड्रोन अनुदान योजना

 

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून आता राज्यात नवीन योजना लागू करण्यात येत आहे. सरकार आता महिला बचत गटांसाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देणार असून त्यासाठी महिला बचत गटांना 8 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Leave a Comment

Close Help dada