Truck Driver Strike हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूक युनियनच्या संपाचा दुसरा दिवस; इंधनटंचाईचे संकट येणार का?

Truck Driver Strike नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूक युनियनने संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसचालक तसेच इंधनाचे टँकरचालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली होती.

 

 

 

ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे केवळ दोन दिवसांचा डिझेल पुरवठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत ट्रकचालकांच्या संपाचा परिणाम एसटीवरही होण्याची शक्यता आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे अजूनही वेळ आहे. टँकरचे दोन प्रकार आहेत. यापैकी एका डीलरला डीसीटी म्हणजेच डीलर कम ट्रान्सपोर्टर म्हणतात. तर बाकीचे फक्त पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे आहेत. त्यांच्याकडे पेट्रोल पंप नाही. हा संप वाहतूकदारांचा असून त्यात पेट्रोल पंप चालकांचा सहभाग नाही. दरम्यान, फॅमफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नका, असे आवाहन केले आहे.Truck Driver Strike

Leave a Comment

Close Help dada